Saturday, April 27, 2024
Homeनाशिककालिदास कलामंदिर भाडे बदलाचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

कालिदास कलामंदिर भाडे बदलाचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

नाशिक | Nashik

कालिदास कला मंदिराच्या दर पत्रकात बदल करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्या दृष्टीने रजेवर जाण्यापूर्वी मनपा आयुक्तांनी घेतलेल्या महासभेमध्ये दर पत्रकात बदल करण्यात आले असून प्रशासकांच्या आदेशानंतर विविध सवलती लागू केल्या जाणार असल्याचे सांगितले आहे…

- Advertisement -

कालिदास कला मंदिराच्या व्यावसायिक हौशी शासनाच्या विविध बैठका, आर्केस्ट्रा, कवी संम्मेलन, जादूचे प्रयोग, मराठी गाण्यांचा कार्यक्रम, शास्त्रीय गायन, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मध्यंतरी प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी कालिदासचे दर कमी करण्याबाबत मनपा आयुक्तांशी संवाद साधला होता. त्या अनुषंगाने या महासभेत झालेल्या निर्णयात किती फेरबदल झाले हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

नव्या प्रस्तावित दराप्रमाणे पूर्वी कालिदास कलामंदिरात अतिरिक्त लाईट, व्हिआयपी कक्ष, व्हिडीओग्राफी यासाठी वेगवेगळे दर आकारले जात होते. ते सर्व दर एकत्र करुन संकलीत एक हजार रुपये भाड्यात वाढवून सर्व सुविधा मोफत करण्याचे प्रस्तावित होते.

त्यात सद्यस्थितीतील कालिदास कलामंदिरात एकुण ९४२ आसनांपैकी मुख्य प्रेक्षागृहामध्ये ६८२, बाल्कनी मध्ये २४० आणि बालकक्षामध्ये २० आसनव्यवस्था आहे. तसेच कलामंदिरात संपूर्ण वातानुकुलित यंत्रणा कार्यान्वित असून रंगमंचामागे एक व्हि.व्हि.आय.पी. ,एक व्ही.आय.पी व ४ मेकअप रूम आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर ६ विश्रामगृहे असून दुसर्‍या मजल्यावर ६ विश्रामगृहे आदी सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे.

महाकवी कालीदास कलामंदीर, प्रॅक्टीस हॉल, विश्रामगृह, महात्मा फुले कलादालन याच्या वापरण्यासाठीच्या सुधारीत नियमावली, भाडे, अनामत आकारणी मध्ये बदल करण्यात आले आहेत. मराठी नाटकांना डिसेंबर २०२३ पर्यंत २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय प्रलंबीत आहे.

९ ते११ | १२.३० ते ३.३० | ५ ते ८ | ९.३० ते १२.३०|

पूर्वीचे दर (प्रस्तावित दर)

रंगित तालिम :

९ ते ११ : ३५०० (४५००),

१२.३० ते ३.३० : ४५०० (५५००),

५ ते ८ : ६००० (७०००),

९.३० ते १२.३० : ८००० (९०००).

व्यवसायिक नाटक, रंगित तालिम, मराठी गाणे

९ ते ११ : ७५०० (८५००)

१२.३० ते ३.३० : १०००० (११०००)

५ ते ८ : १२००० (१३०००)

९.३० ते १२.३० : १४००० (१५०००)

व्यवसायिक नाटक, ऑर्केस्ट्रा :

९ ते ११ : १४००० (१५०००)

१२.३० ते ३.३० : २०००० (२१०००)

५ ते ८ : २३००० (२४०००)

९.३० ते १२.३० : २५००० (२६०००)

प्रत्यक्षात या प्रस्तावावर महासभेत चर्चा करण्यात आलेली असून हा प्रस्ताव स्थायी सभेत जाणे बाकी आहे. त्यानंतर मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर दर बदल लागू करणे तसेच मराठी नाटकांसाठीची २५ टक्के सवलत देण्याबाबत प्रभारी मनपा आयुक्त निर्णय घेतात की, आयुक्त प्रशिक्षणानंतर परतल्यावर त्यावर निर्णय होणार? याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या