Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगावात 9 ऑगस्टला रानभाजी महोत्सव

जळगावात 9 ऑगस्टला रानभाजी महोत्सव

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आत्माचे प्रकल्प संचालक (Atma Project Director), जिल्हा कृषि अधीक्षक, (District Agriculture Superintendent) कृषि विज्ञान केंद्र (Agricultural Science Center) आणि रोटरी क्लब (Rotary Club) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दु. 2 यावेळेत मायादेवी नगरातील रोटरी क्लब येथे रानभाजी महोत्सवाचे (Ran Bhaji Festival) आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक असतात. तसेच रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/ बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही.

महोत्सवा दरम्यान जिल्हयातील शेतकरी विविध रानभाज्या उदा. करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग इ. विविध रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत. तसेच शेतकरी / गटांचे मार्फत अस्सल रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

महोत्सव तालुका स्तरावर दि.09 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सप्ताह स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकरी यांनी त्यांचेकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच जास्तीत जास्त नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवात खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा यांनी केले आहे.

यांची राहणार उपस्थिती

या महोत्सवाकरीता खा. उन्मेश पाटील, खा. रक्षाताई खडसे, माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, महापौर, आ. राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या