Thursday, April 25, 2024
Homeनगररमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचे संचलन

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचे संचलन

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये गुरूवारी शहर पोलिसांनी शहर व उपनगरातील मुख्य मार्गावर पोलीस संचलन केले. आज (शुक्रवार) सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे.

- Advertisement -

नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. गुरूवारी सायंकाळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या नेतृत्वखाली नगर शहरामध्ये तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प, नगर तालुका, व वाहतूक शाखा पोलिसांच्या पथकाने व त्यांच्या समवेत राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी शहरातून संचलन केले. त्याची सुरूवात दिल्ली गेट झाली.

पुढे चितळे रोड, नवी पेठ, कापड बाजार, तेलिखुंट, सर्जेपुरा, कोठला, भिंगार शहर, मुकुंदनगर परिसर या ठिकाणी संचलन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या