Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का रखडली? जाणून घ्या कारण

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले.

शिवसेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीला पाच वाजता सुरुवात होणार होती. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवात झाली नाही.

भाजपने राज्याच्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवत आपला आक्षेप नोंदवला आहे.

तसेच मतमोजणीत तीन मतं बाद करा, अशा आशयाचं पत्र भाजपने पाठवलं आहे. या पत्रामुळे मतमोजणी रखडली आहे. विशेष म्हणजे मतदानावार हरकत ही महाविकास आघाडीकडूनही घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

मतदानावर एकमेकांकडून आक्षेप घेतल्यानंतर मतमोजणी लांबली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरकतींवर निर्णय आला नसल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे. निवडणूक आयोगाला यासंबंधी ईमेल पाठवण्यात आला आहे, त्याचा निर्णय आल्यानंतर मतमोजणी सुरू होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *