Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही – शेट्टी

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही – शेट्टी

मुंबई – उद्धव ठाकरे शेतकर्‍यांच्या बांधावर शेतकर्‍यांचे अश्रु फुसण्यासाठी गेले होते. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना मी तुम्हाला पूर्णपणे चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करतो असं आश्वासन दिले होते. परंतु कर्जमाफीच्या या योजनेअंतर्गत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आल्याने शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शेट्टी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की सरकारने घाईगडबडीत निर्णय न घेता संपूर्ण माहिती घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेण्याची गरज होती.

अजूनही वेळ गेलेली नाही, पुन्हा विचार करुन कर्जमाफीच्या योजनेत बदल करावा. शेट्टी यांना भाजपा सरकारच्या काळात जाहिर केलेल्या कर्जमाफीवर तुम्ही समाधीनी होतात का असा प्रश्न विचारला असता भाजपाने जाहिर केलेल्या कर्जमाफीवर समाधानी नव्हतो असं त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या