Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाRR vs CSK : राजस्थान रॉयल्सला विजयी सूर गवसणार का?

RR vs CSK : राजस्थान रॉयल्सला विजयी सूर गवसणार का?

अबू धाबी | Abu Dhabi

आयपीएल २०२१ मध्ये (IPL 2021) आज शनिवारी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात सायंकाळी ७:३० वाजता सामना होणार आहे…

- Advertisement -

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा पंजाब किंग्ज (PBKS) संघाने रोमहर्षक विजय मिळवल्यामुळे राजस्थान रॉयल्स (RR) संघाला दिलासा मिळाला आहे. त्यांना आपले उर्वरीत ३ सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

शिवाय मुंबई इंडियन्सच्या (MI) पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. चेन्नई सुपर किंग्स संघाने सनराईझर्स हैद्राबाद (SRH) संघावर मात करून बाद फेरी निश्चित केली आहे. सलग ३ पराभवांमुळे आत्मविश्वास गमावलेला राजस्थान दणक्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

राजस्थान आणि चेन्नई आतापर्यंत एकूण २४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात चेन्नईने १५ तर राजस्थान रॉयल्स संघाने ९ विजय मिळवले आहेत. मात्र गतवर्षी यूएईत (UAE) झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईविरुद्ध रॉयल विजयाची नोंद केली होती. आता आजच्या निर्णायक सामन्यात राजस्थान चेन्नईवर मात करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघाबद्दल सांगायचे झाले तर इविन लुईस यशस्वी जयस्वाल यांनी बंगळुरविरुद्ध सामन्यात आकर्षक सुरुवात करून देखील राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन, रियन पराग, राहुल टेवटिया झटपट बाद झाल्यामुळे २० षटकात १४८ धावांवर मजल मारू शकला होता. राजस्थान संघाचा अनुभवी अष्टपैलू क्रिस मॉरीस चमकदार कामगिरी करू शकला नव्हता.

चेन्नई संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. कोलकाताविरुद्ध ऋतुराज गायकवाड , मोईन अली आणि फाफ डू प्लेसिस वगळता एकाही फलंदाजाला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नवहती. धोनी, सुरेश रैनाचे फलंदाजीतील अपयश हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या