Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : "...म्हणून सगळेजण टुणकन तिकडे गेले"; अजित पवारांची नक्कल करत...

Raj Thackeray : “…म्हणून सगळेजण टुणकन तिकडे गेले”; अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

गेल्या महिन्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीतील एका गटाने (NCP) बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या फुटीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटात विभागला गेला आहे. मात्र पक्षफुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटीगाठी आणि शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

Raj Thackeray : “चांद्रयान चंद्रावर पाठवून काय उपयोग, तिथे जाऊन…”; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्र

दुसरीकडे या भेटीमुळे अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांना भाजपशी हातमिळवणी का केलीत? शरद पवारांशी बंडखोरी का केलीत? असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. त्यावर प्रत्येकवेळी अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून “आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत” असे सांगितले जात आहे.

तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून या भेटीवर प्रश्न विचारण्यासाठी दोन दिवसांपूर्वी माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांना गराडा घातल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली होती. त्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांची नक्कल केली आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

यावेळी राज ठाकरे अजित पवारांची नक्कल करत म्हणाले की, “मी तुला दिसलो का गाडीमध्ये, मी गाडीत झोपलो होतो का?” असा प्रश्न विचारतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. आपण या सरकारमध्ये का आला आहात? अजित पवारांना हा प्रश्न विचारल्यानंतर ते , ‘मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे’, असे सांगतात. कशाल खोटं बोलता? सरकारमध्ये सामील होण्याच्या सहा दिवस आधी पंतप्रधान मोदी यांनी काढली ना तुमची, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. मोदींच्या या वक्तव्यानंतर सगळेजण टुणकन उडी मारून दुसऱ्या बाजूला आले. कारण छगन भुजबळ यांनी अजित पवारांना सांगितले असेल, आतमध्ये (तुरुंगात) काय परिस्थिती असते. जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिकडे नको, असा सल्ला भुजबळ यांनी अजित पवारांना दिला असेल, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Ajit Pawar : “… तरच भाजपा अजित पवारांना मुख्यमंत्री बनवेल”; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

- Advertisment -

ताज्या बातम्या