भुसावळ विभागातील ८६ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त

jalgaon-digital
1 Min Read

भुसावळ – bhusawal – प्रतिनिधी :

भुसावळ रेल्वे विभागातुन रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर दि. ३१ मे रोजी ८६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मचार्‍यांना रेल्वेतर्फे तात्काळ २४ कोटी रुपये ऑनलाइन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वेद्वारा व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा यथोचित सन्मान व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधी म्हणुन बर्‍हाणपुर, खंडवा, चाळीसगाव, भुसावळ, बडनेरा, मनमाड, अकोला इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जावून पीपीओ फोल्डर दिले. तसेच मंडल रेल प्रबंधक कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सहा. कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांच्या हस्ते पीपीओ फोल्डर देण्यात आले.

यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता व अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्‍यांना संबोधित करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन सहा.कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी तर आभार मंडळ कार्मिक अधिकारी दिलिप खरात यांनी मानले.यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक आदिंनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *