Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedएरो २०२१ : थरारक कवायतींनी प्रेक्षक थक्क

एरो २०२१ : थरारक कवायतींनी प्रेक्षक थक्क

संरक्षण दलाचे सर्वात मोठे १३ वे ‘एअरो इंडिया शो’ (Aero India) प्रदर्शन आजपासून सुरु झाले. ५ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. दर दोन वर्षांनी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते.

आयआयटी कानपूरचे हेलिकॉप्टर

बंगळुरुमध्ये संरक्षण दलाकडून ‘एरो इंडिया शो’आजपासून सुरु झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. यावेळी चित्तथरारक हवाई कवायतींनी प्रेक्षकांना थक्क केले. भारताचे संरक्षण तंत्रज्ञान आणि सामर्थ्याचे दर्शन यामधून झाला. आयआयटी कानपूरच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाने वैज्ञानिक प्रोफेसर अभिषेक यांच्या देखरेखीखाली या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. इंड्योर-15 (Endure Air15) हेलिकॉप्टर असे याच नाव असून आयआयटी कानपूरने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

- Advertisement -

स्वदेशी बनावटीचे हे हेलिकॉप्टर

आशिया खंडातील सर्वात मोठा एअर शो हा आहे. यामध्ये स्वदेशी हेलिकॉप्टर आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अनेक वैशिष्ट्य असून दहशतवाद्यांचा बिमोड करण्यास भारतीय सैन्याला मोठी मदत होणार आहे. या हेलिकॉप्टरचं डिझाईन हे खास भारतीय सैन्यासाठी करण्यात आले आहे. सध्या या हेलिकॉप्टरच्या चाचण्या सुरू असून रेस्क्यूमध्ये फायदेशीर ठरण्यासाठी विशेष कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

व्हिडिओ डेटा मिळणार

१५ किलोमीटर दूरवरून देखील व्हिडिओ डेटा पाठवू शकतो. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे हेलिकॉप्टर व्हर्टिकल लँडिंग आणि टेकऑफ करू शकणार आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये हे काम करू शकणार आहे. मायनस २० ते ५० डिग्री सेल्सिअसच्या तापमानात देखील हे हेलिकॉप्टर काम करू शकणार आहे. त्यामुळे अतिशय कार्यक्षम असलेलं हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागात खूपच फायदेशीर ठरणार आहे.

तीन दिवसांचा शो

बुधवारी सुरू झालेला ऐरो इंडिया शो ५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ४ व ५ फेब्रुवारी रोजी दोन सत्रे होणार आहेत. पहिला सकाळी ९ वाजेपासून आणि दुसरा दुपारी २ वाजेपासून असेल. प्रदर्शनादरम्यान एकूण पाच एअर शोदेखील होणार आहेत.

काय म्हणाले राजनाथ

राजनाथ म्हणाले – ‘आम्ही संरक्षण क्षेत्रात सुरक्षा उपबंध बळकट करण्यावर भर देत आहोत. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत देशातही मोठी आणि गुंतागुंतीची उपकरणे तयार केली जात आहेत. भारत सरकार येत्या ८ वर्षांत मिलिट्री आधुनिकीकरणावर १३० अब्ज डॉलर्स खर्च करेल. भारत सरकारने संरक्षण क्षेत्रातील ७४ टक्के FDI ला मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त ते शासन पातळीवर शंभर टक्के आहे. या माध्यमातून परदेशी गुंतवणूकदार आपल्या देशात येतील. मालदीव, गुयाना, इराण आणि मेडागास्करचे संरक्षण मंत्री येथे आल्याबद्दल त्यांचे आभार. काही संरक्षण मंत्री व्हर्जुअलरी सहभागी झाले आहेत. ’

- Advertisment -

ताज्या बातम्या