Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगर“अडीच वर्ष घरात बसले अन् तेच आता...”; विखे पाटलांचा ठाकरेंना खोचक टोला

“अडीच वर्ष घरात बसले अन् तेच आता…”; विखे पाटलांचा ठाकरेंना खोचक टोला

राहाता | प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री उध्दव ठकारे यांचा पाहाणी दौरा म्हणजे केवळ फार्स असून, अडीच वर्ष घरात बसले तेच आता शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायला निघाले असल्याचा खोचक टोला महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

- Advertisement -

मंत्री विखे पाटील यांनी आपल्या दुसऱ्या दिवसाच्या पाहाणी दौऱ्याची सुरूवात तालुक्यातील अस्तगाव येथून केली. यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी उध्दव ठकारे यांच्या मराठवाड्या दौऱ्यावर सडकून टिका केली. अडीच वर्ष घरात बसून माझे कुटुंब तुमची जबाबदारी म्हणून ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ज्यांनी वाऱ्यावर सोडून दिले होते तेच आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे आश्चर्य वाटत असल्याचे म्हणाले.

कोव्हीड संकटात राज्यातील शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. बाजार समित्या बंद ठेवल्या. शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला तरी मागील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कवडीची मदत केली नाही. ते आता शेतकऱ्यांना काय देणार असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विषयक निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उत्पादनाला दुप्पट हमी भाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याने आपले तारणहार फक्त पंतप्रधान मोदी आहेत, ही भावना देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याने यांना राज्यातील शेतकऱ्यांनी पुरते ओळखले असून, उध्दव ठाकरे यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम हे बेगडी असल्याचा टोलाही विखे यांनी लगावला.

अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यातील पाणी गावामध्ये शिरले याला फक्त झालेली अतिक्रमण कारणीभूत असून पाण्याचे वाहते प्रवाहच बंद झाल्याने पूर परीस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याची गंभीर दखल घेवून सरकारी जागा आणि ओढ्या नाल्यावरील अतिक्रमण तातडीने काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या पुराचा परीणाम पायाभूत सुविधा उध्वस्त होण्यावर झाल्याने पुन्हा जुने नकाशे काढून ओढ्या नाल्याचे नैसर्गिक स्त्रोत पुर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले असून सर्वच लोकप्रतिनिधीनी ही भूमिका घेतली तर या संकटा पासून वाचता येईल असे विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या