Thursday, April 25, 2024
Homeनगरविखे, तांबे यांच्याकडून जय श्रीरामचा नारा संगमनेरात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक

विखे, तांबे यांच्याकडून जय श्रीरामचा नारा संगमनेरात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर व परिसरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावुन संगमनेरकरांची मन जिंकली. मंत्री विखे यांनी जय जय श्रीराम अशी घोषणाबाजी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष संचारला. आमदार सत्यजित तांबे यांनीही मिरवणुकीत सहभाग दर्शवला महसूलमंत्री विखे आणि तांबे एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

- Advertisement -

संगमनेर शहरात सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही राम नवमीची मोठी तयारी करण्यात आली होती. यावेळी ना. विखे पाटील यांनी नियोजीत दौरे रद्द करून थेट लोणी वरून संगमनेर शहर गाठले. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ना.विखे पाटील यांनी संगमनेर शहरातील राम नवमीच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.यावेळी कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढला.

ना. विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन खाली उतरत नाही तेच आ. सत्यजीत तांबे यांची या मिरवणुकीत एन्ट्री झाली. नामदार आणि आमदार समोरासमोर भेट झाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा कुजबुज झाली.या मिरवणूकीत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मिरवणूक प्रमुख पदाधिकार्‍यांसह हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या