Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजि.प.त नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रांचे रॅकेट

जि.प.त नोकरीचे बनावट नियुक्तीपत्रांचे रॅकेट

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील  योजनांच्या नावाखाली लाभार्थ्यांना बनावट सेवकांनी कोट्यवधींचा गंडा घातला, हे प्रकरण ताजे असतानाच, आरोग्य विभागातील नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देण्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

जिल्हा रूग्णालयात बसून या तोतयांकडून मिळालेली नियुक्तीपत्र घेऊन जिल्हा परिषदेत तपास करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडीस आला. आरोग्य विभागात नोकरीसाठी पैस घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन अनेकांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिेषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना दिले आहेत.

राज्य शासनाने सन २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक, औषध निमार्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. जाहिरात प्रसिध्द होऊन पुढे कोणतीही प्रक्रीया पार पडली नाही.

या भरती प्रक्रीयेसाठी लाखों उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. याच भरती प्रक्रीयेचा संदर्भ घेत काही तोतयांनी या परीक्षांची गुणवत्ता यादी लागली आहे. त्यात तुमची निवड झाली आहे, असे सांगून अर्ज भरलेल्या उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचा अंदाज आहे. 

नाशिकरोड येथील तिघा जणांकडून काही लाख रुपये घेऊन नियुक्तपत्र देतो, असे एकाने सांगितले. त्यातील एकाची आरोग्य विभागात ओळख असल्याने त्याने प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांची भेट घेऊन तपास केला. त्यावेळी डॉ आहेर यांनी आमच्या विभागात अशी कोणतीही पदभरती नसल्याचे स्पष्ट केले.

यावर डॉ. आहेर यांनी त्या तिघांना तुम्ही नियुक्तीपत्र आणल्यास त्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. डॉ. आहेर यांनी लागलीच सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कोणत्याही नियुक्तीपत्रावरून कोणालाही कामावर हजर करून घेऊ नये, आदेश दिले आहेत.  

जि.प. तील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार जिल्हा परिषद स्तरावर असतात. जिल्हा परिषदेतर्फे अशी कोणतीही भरती झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही तोतयांकडून भूलथापांना प्रलोभनाला बळी पडू नये. कुणी तशी नियुक्तीपत्र देत असेल, तर जिल्हा परिषदेस कळवावे.

– डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या