Wednesday, April 24, 2024
Homeनगरसार्वजनिक बांधकाम विभागाकडून बिलाची रक्कम न मिळाल्याने ठेकेदार अडचणीत

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बिलाची रक्कम न मिळाल्याने ठेकेदार अडचणीत

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामाबद्दल एकाही ठेकेदाराला बिल अदा करण्यात न आल्याने ठेकेदार अडचणीत आले आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत पातळीवर दिवाळीत बिले दिले जात असतांना सार्वजनिक बांधकाम खाते मात्र एकाही ठेकेदाराला बिल देऊ न शकल्याने बांधकाम विभागापेक्षा ग्रामपंचायत बरी असे म्हणण्याची वेळ या ठेकेदारांवर आली आहे.

सार्वजनिक बाधकाम विभागामार्फत वेगवेगळी कामे केली जातात. दिवाळी आणि मार्च अखेर ठेकेदारांची बिले अदा केली जातात. अनेक ठेकेदार या विभागाच्या माध्यमातून कामे घेतात. लाखो रुपये गुंतवून कामे पूर्ण करतात. मात्र या ठेकेदारांना बांधकाम खात्याकडून वेळेत बिल अदा केले जात नसल्याचे चित्र आहे.

दिवाळी सण आल्याने काल अनेक ठेकेदारांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन बिले देण्याबाबत अधिकार्‍यांना विनवणी केली. मात्र एकाही ठेकेदाराला एक रुपयाही देण्यात आला नाही. आम्ही दिवाळी साजरी तरी कशी करायची असा सवाल या ठेकेदारांनी बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना विचारला.

- Advertisment -

ताज्या बातम्या