Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात भाजपला मिळणार नवीन साथीदार

राज्यात भाजपला मिळणार नवीन साथीदार

मुंबई :

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण झाली. शिवसेनेने (shiv sena)हिंदुत्वाची भूमिका मवाळ करत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करत सरकार स्थापन केले. आता राज्यात भाजपला (BJP)नवीन साथीदार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

- Advertisement -

४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rss)आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले संभाजी ब्रिगेड (Sambhaji Briged)व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या लेखाने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. कारण आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आगामी काळात भाजपला नवीन साथीदार मिळण्याची शक्यता आहे.

मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर (purushottam khedekar)यांनी भाजपसोबत घरोब्याची भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट होत आहे.

खेडेकरांच्या पत्नी माजी भाजप आमदार

पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा मार्ग या मासिकात केलेल्या पुढील राजकीय स्थितीचा उहापोह केला आहे. त्यात संभाजी ब्रिगेडला आगामी काळात भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या आमदार होत्या. परंतु तेव्हाही खेडेकर यांनी सातत्याने भाजपा आणि RSS च्या विचारसरणीवर टीका करत होते. खेडेकर आणि भाजपा विरोध यांचे अनेक किस्से आहेत.

काय म्हटले आहे लेखात

- Advertisment -

ताज्या बातम्या