Friday, April 26, 2024
Homeनगरपर्स चोरणारा रंगेहाथ पकडला

पर्स चोरणारा रंगेहाथ पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिलेची पर्स चोरताना एकाला नागरिकांनी रंगेहाथ पकडले. रघुनाथ भाऊसाहेब फसले (रा. दौलावडगाव ता. आष्टी, जि. बीड) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रा. ऐश्वर्या हेमंतकुमार गोयल (वय 28 रा. सारडा लेन, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान कापडबाजारात ही घटना घडली. दिवाळी खरेदीसाठी महिला बाहेर पडत आहेत. यामुळे चोरटे सक्रिय झाले आहेत. महिलेकडील पर्स, गळ्यातील दागिने चोरण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. प्रा. गोयल या सोमवारी सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या.

खरेदी झाल्यानंतर त्या पायी घराकडे जात असताना दासी पान सेंटरसमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी प्रा. गोयल यांच्या हातातील पर्स ओढली. त्यांनी आरडाओरडा करताच स्थानिक नागरिकांनी त्या चोरट्याला रंगेहाथ पकडले. यानंतर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या पर्समध्ये पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल होता. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या