अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वक्तव्याचा नाशकात निषेध

jalgaon-digital
2 Min Read

पंचवटी | Panchavati

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने इस्लामपूर (Islampur) येथे आयोजित संवाद यात्रेच्या सभेत आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा नाशिकमधील पुरोहित संघ (Purohit Sangh) व साधू महंतांनी जाहीर निषेध नोंदवत मिटकरी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी इस्लामपूर येथे संवाद यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत हजारो जनसमुदायासमोर आमदार मिटकरी यांनी काही स्तोत्र म्हणून दाखवत टिंगल उडविण्याचा प्रयत्न केला.

मिटकरी यांच्या या कृतीचा व त्यांच्या वक्तव्याचा देशभरात निषेध केला जात असून, नाशिकमध्येही त्याचे पडसाद उमटले. गोदाघाट रामकुंड येथे पुरोहित संघ व साधू महंतांनी मिटकरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मिटकरी यांनी बेताल व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ते ही कृती करत असताना राज्याचे दोन मंत्री व्यासपीठावर असताना त्यांनी मिटकरी यांना थांबवायला हवे होते, मात्र त्यांनी हसून त्यांना एकप्रकारे पाठिंबा दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मिटकरी यांनी तातडीने जाहीर माफी मागावी व राज्य सरकारनेही (State Government) आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी (Demand) यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल (Satish Shukla), महंत अनिल देशपांडे, मुकुंद खोचे, माणिक शिंगणे, देशपांडे गुरुजी, अनिल शुक्ल, राजाभाऊ गायधनी, श्याम नाचन, विनोद थोरात, जगन पाटील आदींसह भारतीय जनता पार्टी (BJP), विश्व हिंदू परिषदेसह (Vishwa Hindu Parishad) विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *