Thursday, April 25, 2024
Homeजळगावदहा दिवसांत 1 लाख 20 हजार क्विंटल कापसाची खरेदी

दहा दिवसांत 1 लाख 20 हजार क्विंटल कापसाची खरेदी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

दरवर्षी दिवाळीपूर्वी आक्टोबरच्या अखेरीस सुरू होणारी सीसीआय तसेच राज्य पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्रे एक महिन्याने उशीरा सुरू करण्यात आली.

- Advertisement -

नोव्हेबरच्या तिसर्‍या सप्ताहात सीसीआयच्या 11 तर 28 नोव्हेंबर रोजी पणन महासंघाच्या तीन केंन्द्रांवर कापूस खरेदी सुरू झाली असून शेतकर्‍यांनी आणलेल्या कापसाची मोजणी झालेल्या मालाचे पैसे किमान चार ते पाच दिवसांच्या कमी कालावधीत मिळावेत.

त्यांना टोकन मिळण्यापासून ते कापूस मोजणी होईपर्यत कोणत्याही अडचणी येउ नयेत यासाठी देखिल विशेष तांत्रीक बाबींची देखिल योग्य ती काळजी घेतली जात असून जिल्ह्यातील कापूस खरेदी केंन्द्रांवर दि. 16 नोव्हेंबरपासून ते आतापर्यत सीसीआयकडून 90हजार ते 1लाख 20हजार क्विंटल तर पणन महासंघाकडून तीन केंद्रांवर 30 ते 35 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गतवर्षी कोरोना प्रसार प्रादूर्भावमुळे कापूस खरेदी दोन ते तीन वेळा थांबविण्यात आली होती. तरी देखिल नोंदणी करून देखिल सुमारे 30 ते 35 टक्के शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीनंतर बहुतांश ठिकाणी वाहने खाली करणारे मजूरच वेळेवर उपलब्ध न झाल्याने घरातच पडून होता.

त्यामुळे जिल्हयात चावर्षी कापूस खरेदी लवकर सुरू होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांकडून केली जात होती. परंतु नोव्हेबर मध्यानंतरच कापूस खरेदीस सुरूवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यात नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांचा कापूस सीसीआयकडून जळगाव, पाचोरा, चाळीसगांव, जामनेर, बोदवड, अमळनेर, चोपडा, एरंडोल अशा 11 केन्द्रांवर खरेदी केला जात असून बहुतांश खरेदी केंन्द्रांतर्गत तीन प्रोससिंग युनिट सुरू करण्यात आले आहेत.

आतापर्यत जिल्हयात सीसीआयच्या केन्द्रांवर सुमारे 1लाख,20हजार क्विंटलच्यावर कापसाची खरेदी करण्यात आली असून ट्रॅक्टर, मेटॅडोर व मिनी वाहन अशा सुमारे 130 ते 150 वाहनांव्दारे आलेला कापूस प्रोसेंसिंग केद्रांवर मोजणी केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या