Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर : पिल्लांना वाचवण्यासाठी माऊलीने घेतली आगीत झेप

सिन्नर : पिल्लांना वाचवण्यासाठी माऊलीने घेतली आगीत झेप

सिन्नर । Sinnar

घार आकाशत उडत असली तरी तिचे लक्ष जमिनीवर असणार्‍या पिलांकडे असते असं म्हटलं जातं.

- Advertisement -

जगाच्या पाठीवर माय अशी असते जी लेकरांसाठी जीवाची बाजी लावायलाही मागे-पूढे पहात नाही. आईची ही महती उगाच गायली जात नाही. मुके असले तरी प्राणीही त्यात मागे नसतात. याचीच प्रचिती दोन दिवसांपूर्वी आली.

शेतात लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी आपली पिल्ले आल्याचे पाहून जीवाची पर्वा न करता मुक्या माऊलीने पिल्लांना वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली खरी परंतु त्यात माऊलीसह तिच्या तीनही पिलांचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना घडली.

येथील गडाख यांच्या शेतात मशीनच्या साहाय्याने मका काढत असतांना अचानक मशिनला आग लागली आणि बघता-बघता ही आग परिसरात पसरली. घरच्या दुभत्या जनावरांसाठी गडाख यांनी तिन- साडेतीन ट्रॅक्टर वैरण त्याच भागात साठवली होती. या आगीच्या भक्ष्यस्थानी पहिल्यांदा ही वैरण सापडली.

या वैरणीच्या आडोशालाच गडाख यांनी पाळलेल्या लॅब्रेडियन कुत्रीची पंधरा दिवसांची तीन पिल्ले झोपलेली होती. गडाख यांच्यासह कुणाच्याही ही बाब लक्षात आली नाही.

मात्र, आगीचे लोळ पाहून परिसरातच फिरणार्‍या पिल्लांच्या आईला आपल्या पिल्लांवर आलेल्या संकटाची जाणिव झाली आणि क्षणाचाही विलंब न करता धावत पळत आलेल्या या माऊलीने जीवाची पर्वा न करता थेट आगीत उडी घेत पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काही कळण्याच्या आत घडलेल्या या प्रकाराने उपस्थित सारेच अवाक झाले. आगीने रौद्र रुप धारण केले असल्याने पूढे जाणे कुणालाही शक्य नव्हते.

पाणी मारुन आग विझणेही अवघड होते. तरीही परिसरातील सर्व विद्युत मोटारी सुरु करुन पाण्याचा मारा करुन आग विझवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, परिसरात पसरलेली वैरण आणि मोकळ्या रानातील हवेने ही आग वाढतच गेली आणि संपूर्ण वैरण जळून खाक झाल्यानंतरच आग शांत झाली. त्यात मातेचा करुण अंत झाला होता. मात्र, त्यापूर्वी तीने आपल्या तिनही पिल्लांना अंगाखाली घेऊन आगीपासून वाचवण्याचा अटोकात प्रयत्न केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या