Thursday, April 25, 2024
Homeनगरपुणतांबा ग्रामीण रुग्णालयातील वृक्ष तोडणार्‍यांवर कारवाई करावी

पुणतांबा ग्रामीण रुग्णालयातील वृक्ष तोडणार्‍यांवर कारवाई करावी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा ग्रामीण रुग्णालय येथे ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली काही वर्षापूर्वी लावलेली मोठमोठी झाडे तोडून पर्यावरणाचा र्‍हास केला

- Advertisement -

असून शासनाच्या नियमाचा भंग केला आहे. झाडे तोडण्याचे आदेश कोणी दिले व का तोडले याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच डॉ. धनंजय धनवटे व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात मुरमाट खडकाळ जमिनीवर करंज 45, बाबूं 50, सिसम 65, लिंब 40 या प्रकारची विविध झाडे चार वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली लावण्यात आले. परंतु चार ते पाच दिवसापूर्वी जेसीबीच्या साह्याने 160 ते 170 लहान मोठी झाडे तोडून जमीनदोस्त करण्यात आली.

10 ते 12 वर्ष वयाची मोठी लिंबाची झाडे तोडण्यात आली. ग्रामसभेने गावात कुर्‍हाडबंदीचा ठराव करण्यात आलेला आहे. शासकीय संस्थेने बेसुमार वृक्षतोड करून पर्यावरणाचा र्‍हास केला आहे, असा आरोप ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी निवेदनात केला आहे .

झाडे तोडण्याची कोणतीही पूर्वकल्पना ग्रामपंचायत प्रशासनास दिलेली नाही. सदर झाडे तोडण्याचे आदेश कोणी दिले? का तोडले? याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे सरपंच डॉ. धनवटे व ग्रामविकास अधिकारी श्री. पटाईत यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी राहाता, वनपाल परिक्षेत्र अधिकारी व लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग कोपरगाव, वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय पुणतांबा यांना निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत.

शासनाच्या 1 लाख 33 कोटी वृक्ष लागवड या योजनेतून पुणतांबा ग्रामीण रुग्णालय परिसरात झाडे लावण्यात आले. रोजगार हमी योजनेतून एक महिलेच्या मजुरीवर तीन वर्ष ही झाडे देखभाल करण्यासाठी अंदाजे 2 लाख 16 हजार रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांच्याकडे निकीता जाधव यांनी संपर्क साधला असता जे झाडे कंपाऊन्डला हानीकारक आहे अशी झाडे काढून टाकावी. सर्वच झाडे काढण्याचे सांगितले नव्हते. परंतु सदर झाडे का तोडण्यात आली याची चौकशी करून ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकाद्वारे किसान क्रांती युथ फौडेशनच्या अध्यक्षा निकीता जाधव यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या