Friday, April 26, 2024
Homeनाशिकपुनद योजनेचे काम अंतिम टप्प्यात - नगराध्यक्ष सुनील मोरे

पुनद योजनेचे काम अंतिम टप्प्यात – नगराध्यक्ष सुनील मोरे

सटाणा । प्रतिनिधी Satana

शहराला संजीवनी ठरणार्‍या सुमारे 51 कोटी रुपये खर्चाची पुनद पाणीपुरवठा योजना Punad Water supply scheme अंतिम टप्प्यात आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे Former Union Minister of State for Defense Subhash Bhamre यांच्या हस्ते पुनद पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन होणार असून देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात जलपूजन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

- Advertisement -

कार्यक्रमास आ. दिलीप बोरसे यांच्यासह उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, माजी आ. दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, सर्व विद्यमान नगरसेवक, सर्व माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, शहरातील वकील संघाचे सदस्य, डॉक्टर संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्वच पक्षाचे पदाधिकारी, सर्व संघटना व शहरातील सुजाण नागरिकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांच्या घरोघरी पुनद धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पोहचणार आहे. पुनद पाणीपुरवठा योजनेमुळे सटाणावासियांचे पिण्याच्या पाण्याचे संकट दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

नगर परिषद निवडणुकीतील शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचे आश्वासन तीन वर्षाच्या कालावधीत पूर्णत्वास आले असून, शहरातील चौगाव बर्डी येथील दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. याठिकाणी आवश्यक संरक्षक भिंत बांधकाम व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या