Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपुलवामात २४ तासांत ७ दहशतवादी ठार

पुलवामात २४ तासांत ७ दहशतवादी ठार

पुलवामा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलास हे मोठे यश मिळाले आहे.

- Advertisement -

पुलवामा सेक्टरमध्ये २४ तासांत दुसरी चकमक झाली. या चकमकीत एकूण ७ दहशतवादी ठार झाले. तसेच १ जवान शहीद झाला. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री १ वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ३ दहशतवादी ठार झाले. गेल्या २४ तासांत ७ दहशतवादी ठार झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या