Thursday, April 25, 2024
Homeजळगावरेशनच्या आधार सिंडींग प्रक्रियेला वेग

रेशनच्या आधार सिंडींग प्रक्रियेला वेग

जळगाव – Jalgaon

जिल्हयात तसेच जळगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय योजना अशा प्रत्येक लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांकाचे सीडींग 31 जानेवारीपर्यत प्रत्येक दुकानावर पूर्ण करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश देण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यत सहा लाखांपेक्षा अधिक शिधापत्रिकेतील एका व्यक्तींचे आधार सिडींग करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभाग सुत्रांनी दिली.

दि.30 जानेवारी 2021 अखेर शहरी व ग्रामीण भागातील रेशन दुकानदार यांनी त्यांच्याकडे असलेल्या लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल लिंकिंगचे कार्य पूर्ण करावे. जेणेकरून कोणताही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या