Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘एव्हिएशन विंग्स’ प्रशिक्षणात कॅप्टन वैभव यांना तीन पारितोषिके

‘एव्हिएशन विंग्स’ प्रशिक्षणात कॅप्टन वैभव यांना तीन पारितोषिके

नाशिक | प्रतिनिधी |Nashik

कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्स अभ्याक्रमातील (Combat Army Aviators Course) ३० जवान कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (Combat Army Aviation Training School) मधून पदवीधर (Graduate) झाले. खडतर प्रशिक्षण घेऊन हे जवान एव्हिएशन विंग्ससाठी पात्र ठरले आहे. आता त्यांच्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

- Advertisement -

आर्मी कमांडर (Army Commander), ARTRAC द्वारे जवानांना एव्हिएशन विंग्स प्रदान करण्यात येते. या वर्षी त्यासाठी ३० जवान पात्र ठरले. पदवीप्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (Lieutenant General Raj Shukla) (पीव्हीएसएम वायएसएम एसएम, एडीसी, जनरल ऑफिसर कमांडिंग ईन चिफ) होते. प्रमुख अतिथी लेफ्टनंट जनरल आर के शर्मा (Lieutenant General R. K. Sharma) (कमांडंट स्कूल ऑफ आर्टिलरी) उपस्थित होते.

गांधीनगर (gandhi nagar) येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’ ही भारतीय लष्कराची प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्था (Flight Training Institute) आहे, जी आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) च्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.

पारितोषिक जिंकून उत्तीर्ण झाले, त्यांना एकूण गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाल्याबद्दल ‘सिल्व्हर चीता’ पारितोषिक, शैक्षणिक विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल ‘एअर ऑब्झर्व्हेशन पोस्ट – 35’ पारितोषिक व तोफखाना संबंधीत विषयांमध्येही क्रमांक मिळाल्याबद्दल ‘कॅप्टन पी. के. गौड’ चषक देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले.

त्याचबरोबर कॅप्टन मोहित राज यांना उड्डाण कौशल्यासाठी एकूण गुणवत्तेत प्रथम स्थान मिळविल्याबद्दल ‘कॅप्टन एस. के. शर्मा’ चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. या जवानांनी प्रशिक्षण पूर्ण करत आपल्या वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

कार्यक्रमानंतर ‘चिता’ व ‘चेतक’ या हेलिकॉप्टर्सचे थरारक प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या