Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपूर नियंत्रण उपायांसाठी निधीची तरतूद करा

पूर नियंत्रण उपायांसाठी निधीची तरतूद करा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

शाकंबरी व लेंडी नद्यांना आलेल्या महापुरामुळे Flood अनेक रस्ते, पूल आणि दुकाने वाहून गेल्याने जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे. सदर नुकसान पाहता ठोस उपाययोजना करण्यासाठी flood control measures नदीचे खोलीकरण, संरक्षक भिंत व इतर कामासाठी 7 कोटींचा निधी funds उपलब्ध करून द्यावे, असे साकडे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे Urban Development Minister Eknath Shinde यांना निवेदनाव्दारे घातले असल्याची माहिती आ. सुहास कांदे MLA Suhas Kandeयांनी दिली.

- Advertisement -

नांदगाव शहरात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे शाकंबरी व लेंडी नदीस आलेल्या महापुरामुळे अनेक भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अनेक रस्ते आणि पूल देखील वाहून गेले, पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईन देखील बाधित झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आ. सुहास कांदे यांनी शहरातील नदीचे खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे आणि विवेक हॉस्पिटल ते स्मशानभूमी वाहून गेलेला पुल बांधणे याकामी नगर परिषदेला लागणारा मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठीचे निवेदन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

यावेळी आ. कांदे यांनी शहरात झालेल्या नुकसानीची चित्रफीत आणि छायाचित्रांच्या माध्यमातून ना. शिंदे यांना माहिती दिली. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा शहरावर येऊ नये म्हणून या उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी लागणारा हा निधी होईल तितक्या लवकर उपलब्ध करून देण्याची विनंती ना. शिंदे यांना केली.

ना. शिंदे यांनी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मकता दाखवली असल्याने लवकरच निधी उपलब्ध होईल, असा विश्वास आ. कांदे यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या