Thursday, April 25, 2024
Homeनगरबालकांच्या संरक्षणाच्या जिल्हा कृती दलात भिक्षेकरी पुनवर्सनाचा विषय

बालकांच्या संरक्षणाच्या जिल्हा कृती दलात भिक्षेकरी पुनवर्सनाचा विषय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविडमध्ये दोनही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा स्तरावरील कृतीदलात आता भिक्षेकरी पुनवर्सनाचा विषयाचा समावेश करण्यात आला. यासह तालुकास्तरावर असणार्‍या मिशन वात्सल्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गठीत तालुका समन्वय समितीमध्ये या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासाठी काम करणार्‍या संस्थांमधील बालकांना तसेच कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे योग्य संगोपन होण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समितीच्या कामकाजाची व्याप्ती वाढण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे.

या समितीकडे आता आता भिक्षेकरी पुनवर्सनाचा विषयाचा समावेश करण्यात आला. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून समितीत मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. ही आता भिक्षेकरी पुनवर्सनाचा विषय हाताळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या