Thursday, April 25, 2024
Homeनगरप्राध्यापकांना 8 वर्षांनंतर न्याय

प्राध्यापकांना 8 वर्षांनंतर न्याय

पुणतांबा | Puntamba

राज्यातील वरीष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणार्‍या अंदाजे 27 हजार प्राध्यापकांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी

- Advertisement -

17 मार्च 2013 ते 10 मे 2013 मध्ये विद्यापीठाच्या परीक्षेवर 71 दिवस टाकलेल्या बहिष्कार आंदोलनाचा पगार काल राज्यातील सर्वच अकृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या खात्यावर जमा झाल्यामुळे या आंदोलनात प्राध्यापकांना अनेक संघर्ष केल्यानंतर व न्यायालयीन लढाई लढल्यानंतर काही अंशी न्याय मिळाल्याची माहिती एम पुक्टोचे जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ. एस. व्ही. लवांडे यांनी दिली आहे. या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यातील 1140 प्राध्यापकांना झाला आहे.

प्राध्यापकांनी न्याय्य मागण्यांसाठी परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. मात्र सरकारने संप गृहीत धरून प्राध्यापकांच्या 71 दिवसांचे वेतन कपात केले होते. संप व बहिष्कार याबाबत प्राध्यापक संघटनांनी हा प्रश्न राज्य सरकारसमोर स्पष्ट केला होता. पण सरकारने संप गृहीत प्राध्यापकांच्या पगारात कपात केली होती.

अखेर ह्या प्रश्नावर संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात 2018 मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल लागून प्राध्यापकांना 8 टक्के व्याजासह त्यांचा परीक्षांच्या बहिष्कार आंदोलनाचा पगार देण्यात यावा असा न्यायालयाने आदेश केला होतो. राज्य सरकारने या निर्णयावर मार्च 2018मध्ये हरकत घेऊन उच्चतम न्यायालय दिल्ली येथे आव्हान दिले होते.

उच्चतम न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम केल्यामुळे तसेच प्राध्यापकांना तातडीने 71 दिवसांचे वेतन जमा करण्याचे आदेश राज्य सरकारला दिल्यामुळे अखेर काल बहुतांशी विद्याापीठातील प्राध्यापकांच्या खात्यावर वेतन जमा झाले आहेत मात्र व्याजाची रक्कम अद्यापही देय असल्याचे डॉ. लंवाडे यांनी स्पष्ट केले आहे. 8 वर्षानंतरही प्राध्यापक संघटनेच्या लढयाला यश आल्याबद्दल जिल्ह्यातील प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या