Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक न्यायालयाचे कामकाज एकाच सत्रात

नाशिक न्यायालयाचे कामकाज एकाच सत्रात

नाशिक | Nashik

आतापर्यंत जिल्हा न्यायालचे दोन सत्रामध्ये सुरू असलेले काम यापुढे एकाच सकाळच्या सत्रात करण्यात येणार आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालयाने सुचविलेल्या यादीतील खटल्यांचे कामच यामध्ये होणार असून, अटी व शर्थी मात्र कायम ठेवण्यात आल्या आहेत.

याबाबत न्यायालय व नाशिक बार असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली असून त्यामध्ये याबाबत चर्चा झाली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्हा न्यायालयाचे काम प्रभावीत झाले आहे. एकुण कामावर तसेच खटले चालवण्यावर अनेक मर्यादा येत आहे. सप्टेंबरमध्ये पुर्णवेळ न्यायालये सुरू होतील अशी अपेक्षा वकीलांना होती.

मात्र यात फार काही बदल झालेला नाही. यामुळे वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रारंळी दोन सत्रात न्यायालयाचे काम सुरू होते. त्यात फक्त कोठडीशी संबंधित खटल्यांना प्राधन्य देण्यात आले होते. यामध्ये दोन ते तीनच न्यायालये या काळात सुरू होती.

आता उच्च न्यायालयाने सर्वच ३२ न्यायालयांना सकाळी साडेदहा ते दीड या वेळेत काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यात पहिल्या अटी व शर्थी कायम ठेवल्या आहेत. काही खटल्यांना सुट देण्यात आली असली तरी न्यायालयाचे काम पूर्ण क्षमेतेने सुरू होणार नाही.

एकीकडे वाढणारा करोना आणि दुसरीकडे कामांना न मिळणारी गती अशा कात्रीत सर्व सापडले आहेत. सप्टेंबर महिन्याअखेरीस यात काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा नाशिक वकील संघाचे अध्यक्ष ऍड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

ई कोर्ट कामकाजाला गती मिळावी

देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट असलेल्या ई कोर्टाचे कामही ठप्प पडले आहे. ऑनलाईन अथवा ऑफलाईन काम होत नसल्याचा फटका लाखो पक्षकरांसहीलांना बसतो आहे. तुर्तास ठप्प पडलेल्या ई कोर्टाच्या कामास गती मिळावी, किमान या माध्यमातून खटल्यांच्या कामांना गती मिळू शकते.

ई कोर्टाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याचा न्याय व्यवस्थेला, वकीलांना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षकारांना फायदा मिळेल अशा अपेक्षा वकिल करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या