Friday, April 26, 2024
Homeजळगावलूट करणारी खासगी रुग्णालये मनपा प्रशासनाच्या रडारवर

लूट करणारी खासगी रुग्णालये मनपा प्रशासनाच्या रडारवर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमिवर उपाययोजनांसदर्भात आज बुधवारी वाजता महापालिकेत आमदारांसह महापौरांनी आढावा बैठक घेतली.

- Advertisement -

या बैठकीत शहरात रुग्णांच्या कॉन्स्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात अशा सुचना आमदारांकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या.

तसेच करोनाबाधित रुग्णांकडून नियमबाह्य पध्दतीने बिले आकारणार्‍या खाजगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यास कोवीड सेंटरवर रुग्णांना उत्कृष्ट सुविधेसह चांगल्या दर्जाचे जेवण देण्याचा निर्णय झाला.

या बैठकीला शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मनपा उपायुक्त गोसावी , कपिल पवार, विरोधी पक्षनेते सुनील महाजन , नगरसेवक कुंदन काळे ,मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.शिरीष ठुसे , मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलानी, विजय घोलप यांच्यासह खाजगी रुग्णायांचे डॉक्टर आदींची उपस्थिती होती.

या बैठकीमध्ये कोरोना संदर्भात शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याच बरोबर अनेक उपाययोजनां वर विचार विनिमय करण्यात आला.

कॉन्टॅक ट्रेसिंगला प्राधान्य द्या

शहरांमध्ये आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वर जास्तीत जास्त भर दिला जावा , तसेच बाहेरगावाहून येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला आता 14 दिवस विलगीकरणात रहाणे बंधनकारक असणार आहे.

जेणेकरून कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल. कोवीड केअर सेंटर मधून काही रुग्णांनी जेवणा संबंधित तक्रारी केल्या होत्या, त्यामुळे आता कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना पोषक , चांगल्या दर्जाचे आणि वेळेवर जेवण देण्यात यावे, अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी बैठकीमध्ये केल्या आहेत.

तसेच कोवीड केअर सेंटर मधील रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम रित्या केली जावी, असेही बैठकीमध्ये सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या