Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशआपण आजवर अनेक संकटं पाहिली, पुढील २५ वर्ष...; काय म्हणाले पीएम मोदी?

आपण आजवर अनेक संकटं पाहिली, पुढील २५ वर्ष…; काय म्हणाले पीएम मोदी?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आज देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधन केले…

- Advertisement -

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला येऊन लाल किल्ल्यावरून (Red Fort) भाषण करणारा मी पहिला पंतप्रधान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या प्रवासात देशाने अनेक चढउतार पाहिले. २०१४ मध्ये देशवासियांनी मला जबाबदारी दिली. देशातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करण्याचा महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) मंत्र मी जपला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, आपण आजवर अनेक संकटांचा सामना केला. अन्नाचे संकट झेलले. कधी युद्धाची शिकार झालो. दहशतवादाचे संकट आले. अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देशावर अनेक नैसर्गिक संकटे आली. मात्र भारत देश सतत पुढे चालत राहिला.

देशाची विविधता हीच भारताची अनमोल शक्ती आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. संपूर्ण जग आपल्या देशाकडे गर्वाने, अपेक्षाने पाहत आहे. प्रत्येक समस्येचे समाधान शोधण्यासाठी जग आपल्याकडे पाहत आहे.

Live : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे देशवासियांना संबोधन, पाहा व्हिडीओ…

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोक लढतील. भारत अंधकारयुगात जाईल, अशा अनेक कुशंका व्यक्त केल्या गेल्या. मात्र या देशाच्या मातीत सामर्थ्य आहे, असे संबोधन त्यांनी देशवासियांना केले.

75 वर्षांचा कालखंड कितीही कठीण किंवा चांगला असला तरी पुढील 25 वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे १३० कोटी देशवासीयांच्या स्वप्नांकडे मी पाहत आहे. जेव्हा स्वातंत्र्याचे 100 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे लागणार आहे.

राष्ट्रध्वज फडकवण्याचे काय आहेत नियम?; जाणून घ्या सविस्तर

येणाऱ्या 25 वर्षांसाठी पंचप्राणावर आपली शक्ती केंद्रित करावी लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढील काळात भारताला विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करायची असेल, तर पंचप्राण ही संकल्पना महत्त्वाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोडाळेच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा; ‘हा’ पुरस्कार जाहीर

- Advertisment -

ताज्या बातम्या