Thursday, April 25, 2024
Homeनगरप्राथमिक शिक्षक कृती समितीचा एल्गार

प्राथमिक शिक्षक कृती समितीचा एल्गार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटना व गुरुकुल मंडळ, सदिच्छा मंडळ, गुरुमाउली मंडळ, बहुजन मंडळ यांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली असून समितीने जिल्हा उपनिबंधक व शिक्षक बँकेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे बँकेतील अनाठायी कारभाराला आळा घालण्याची मागणी केली आहे. तसेच बँकेतील सत्ताधार्‍यांविरुद्ध एल्गार पुकाराला आहे.

कृती समितीने काढलेल्या पत्रकात बँकेचा कर्ज व्याजदर तातडीने नऊ टक्के करावा, अभ्यास गटासारखे फार्स व कर्ज व्याजदर कमी करणे संदर्भाने बँकेत सत्ताधार्‍यांनी बोलावलेल्या बैठका कृती समितीला अमान्य आहेत. शताब्दीनिमित्त सभासदांना देण्यात येणार्‍या घड्याळात संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला असून घड्याळ वाटपावर संघटना एकत्रितपणे बहिष्कार टाकल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

कर्मचारी सातवा वेतन आयोग फरकापोटी संचालकांनी सर्व कर्मचार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले आहेत. याची चौकशी होऊन कारवाई व्हावी, सद्य परिस्थितीमध्ये करोना संसर्गामुळे संचारबंदी असल्याने कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करता येत नसल्याचा गैरफायदा संचालक मंडळाने घेऊ नये, असा इशाराही दिला.

पत्रकावर कृती समितीचे रा. या. औटी, राजेंद्र शिंदे, आबा लोंढे, संजय शेळके, नितीन काकडे, अरुण आवारी, दिलीप दहिफळे, सुनील जाधव, राजेंद्र निमसे, संजय धामणे, बाळासाहेब कदम, प्रवीण ठुबे, गौतम मिसाळ, विजय काकडे, नीळकंठ घायतडक, बाबा आव्हाड, राजेंद्र ठोकळ, सुभाष तांबे, दत्तात्रेय जपे, रामदास भापकर, बापू लहामटे, रवींद्र पिंपळे, एकनाथ व्यवहारे, विकास डावखरे, संतोष सरोदे, मीनाक्षी तांबे, वृषाली कडलग यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या