Saturday, April 27, 2024
Homeनगरप्राथमिक आरोग्य केंंद्राच्या निविदा रद्द केल्याच्या निषेधार्थ घंटानाद

प्राथमिक आरोग्य केंंद्राच्या निविदा रद्द केल्याच्या निषेधार्थ घंटानाद

अहमदनगर/ शेवगाव |प्रतिनिधी| Ahmednagar

शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामाच्या निविदा चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी मंगळवार (दि.23) रोजी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांना निवेदन दिले आहे.

- Advertisement -

यावेळी ठाकूर पिंपळगाव येथील संजय आंधळे, विजय दहिफळे, सुरेश दहिफळे, प्रमोद दहिफळे, संदीप दहिफळे, सोमनाथ दहिफळे, गोविंद खेडकर, सुरज पालवे, भागवत रासनकर तर ठाकूर निमगाव येथील ज्ञानदेव कातकडे, आत्माराम निजवे, कल्याण ससाणे, भाऊसाहेब कर्डिले, भाऊसाहेब निजवे, श्यामराव निजवे, सखाराम घावटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामाच्या निविदा चुकीच्या पद्धतीने रद्द केल्याचा आरोप सदस्या काकडे यांनी केला आहे. अशा पध्दतीने जिल्हा परिषद प्रशासन चुकीचे काम करत असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद निधी खर्च करत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती.

जिल्हा परिषदेत काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी निविदा प्रक्रिया झालेली कामे रद्द करण्याचा प्रयत्न करत असून ही बाब चुकीची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्या निदर्शनास आणून दिले. तातडीने आधीच्या निविदेनुसार या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे करावीत, अन्यथा मंगळवार दि.23 रोजी जिल्हा परिषद उपोषण करत चुकीचे कामे करणार्‍या विरोधात घंटानाद करण्यात येणार असल्याचा इशारा काकडे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या