Friday, April 26, 2024
Homeनाशिकअंडी, चिकनला मागणी वाढल्याने दरात सुधारणा

अंडी, चिकनला मागणी वाढल्याने दरात सुधारणा

नाशिक । Nashik
करोना विषाणूचा संसर्ग झाल्यास या काळात अंडी , चिकन खाण्यास प्राधान्य दिले जात आहे.या पार्श्वभूमीवर चिकन आणि अंड्याला मागणी वाढली आहे.मात्र,अंडी आणि चिकनच्या मागणीनुसार पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.

कडक ऊन पडत असून या वर्षी लवकर उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे कोंबड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढले आहे.त्यातच पक्षांची पुरेशी वाढही होत नसल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने अंडी व चिकनचे भाव वाढले आहे.बर्ड फ्लूच्या संकटानंतर मागील महिनाभरात पोल्ट्री उद्योगात गतवेळच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.

- Advertisement -

मागील वर्षी करोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मध्ये पोल्ट्री उद्योगाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान जिल्ह्यातील पोल्ट्री मालकांना झाले होते.त्यामुळे आता ही गेल्या पंधरा दिवसांपासून करोना व्हायरसचा संसर्ग अधिक वाढत असल्याने पुन्हा लोकडाऊनची भीती असल्याने कोंबडी उत्पादन कमी झाले.

विकेंडमध्ये चिकन विक्रीला परवानगी नव्हती. मात्र, परवानगी मिळाल्याने चिकन विक्री सुरू झाली. त्याचा फायदा दरात सुधारणा होण्यास झाला आहे. करोनामुळे मागणी वाढली आहे.पंधरा दिवसांपूर्वी ठोक जिवंत कोंबडीला असलेले 80 रुपये किलोचा दर आता 110 रुपयांवर गेला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी आणि दरात वाढ होण्याचा तज्ञांचा अंदाज आहे.उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणी पोल्ट्री मालकांनी पिल्ले टाकलेले नाहीत. उत्पादन कमी झाल्याने सध्या कोंबड्यांचा पुरवठा कमी होत आहे. मागणी मात्र दुपटीने वाढली असून इतर राज्यांतून एक कोटी अंडी पुरवठा होत आहे.

मागील महिनाभराच्या तुलनेत सध्या अंड्याला प्रचंड मागणी वाढल्याने ठोक दरात दीड ते दोन रुपये प्रति अंडी वाढ झाली असून सात रुपये दराने विकली जात आहे.

दर खालील प्रमाणे
चिकन
ब्रॉयलर कोंबडी 90 ते 110 रुपये प्रतिकिलो( जिवंत)
ठोक चिकन विक्री 210 ते 240 प्रति किलो (किरकोळ)
अंडी
प्रति शेकडा पाचशे ते साडेपाचशे रुपये (ठोक)
प्रति शेकडा 650 ते 700 रुपये (किरकोळ)

- Advertisment -

ताज्या बातम्या