Thursday, April 25, 2024
Homeनाशिकयेवल्यात जोरदार पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला

येवल्यात जोरदार पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला

येवला | प्रतिनिधी | Yeola

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी येवल्याच्या पूर्व भागातील अंगुलगाव, भारम पट्‌ट्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार मृगधरा बरसल्याने नदी, नाले ओसंडून वाहू लागले…

- Advertisement -

तालुक्याचा पश्चिम भाग वगळता पूर्व भागातील आठ ते दहा गावात या पावसाने धो-धो बरसत सर्वत्र पाणीच पाणी केले. खरवंडी, भारम, वाघाळा, अंगुलगाव, कोळम, रेंडाळे या तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

काही गावांमधील बंधारे पहिल्याच पावसात पूर्ण भरून वाहू लागले आहेत. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाने सलामी दिल्याने बळीराजा सुखावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने पेरणीच्या कामालादेखील वेग येणार आहे. पाटोदा, नगरसुल, राजापूर, विखरणी, कातरणी, आडगाव रेपाळ, कानडी, कातरणी, विसापूर, ठाणगाव, खैरगव्हाण यांसह काही भागात शेतकर्‍यांनी मका पेरणी सुरू केल्याने या पावसाचा पिकांना नक्कीच फायदा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या