चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

विवाह (marriage) सोहळ्याआधी प्री-वेडिंग शूट (Pre-wedding shoot) ही आजकाल फॅशन झाली आहे.

लग्नापूर्वी प्री- वेडिंग शूट झालेच पाहिजे, ते केल्याशिवाय लग्नच पूर्ण होत नाही, अशी फॅशन रूढ झाली आहे. एका बहाद्दराने चक्क नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Offices of Nashik) प्री वेडिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच विवाह नोंदणी कार्यालय (Marriage Registration Office) आहे. येथे आलेल्या नाशिकमधील एका नववविवाहीत जोडप्याने चक्क कार्यालयाच्या इमारतीतच ‘प्री वेडींग शूट’ (Pre-wedding shoot) करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या घटनेची चर्चा शहरात आहे. सकाळी कार्यालयीन कामकाजाची वेळ असल्याने कामाची रेलचेल होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या ही बाब एका कर्मचाऱ्याने बाब निदर्शनास आणून देताच त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्याचे समजते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *