Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशAtique Ahmed : उमेश पाल प्रकरण नेमकं आहे काय? ज्यामध्ये अतिक अहमदसह...

Atique Ahmed : उमेश पाल प्रकरण नेमकं आहे काय? ज्यामध्ये अतिक अहमदसह तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली

दिल्ली | Delhi

प्रयागराजच्या स्पेशल एमपी-एमएलए कोर्टाने उमेश पाल अपहरण प्रकरणात निकाल दिला आहे.

- Advertisement -

१७ वर्षे जुन्या या अपहरण प्रकरणात तसेच न्यायालयाने अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला ५,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात न्यायालयाने माफिया अतिक अहमदसह तीन आरोपींना दोषी ठरवले आहे, तर सात आरोपींना निर्दोष घोषित केले आहे.

2006 मध्ये माजी आमदार राजू पाल यांच्या हत्येचा साक्षीदार उमेश पाल यांना धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप अतिक अहमदवर होता. यापूर्वी उमेश पाल यांचीही प्रयागराजमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अतिक हाही आरोपी आहे.

2004 मध्ये राजू पाल, त्यांची पत्नी पूजा पाल आणि उमेश पाल बसपमध्ये होते. अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अश्रफ समाजवादी पक्षामध्ये होते. राजू पाल यांनी बसपकडून तिकीट मिळवण्यासाठी अतीक अहमद आणि त्यांच्या कटुंबाविरुद्ध जोरदार प्रचार केला होता.

अलाहाबाद पश्चिम मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर अतीक अहमद यांचे धाकटे भाऊ अश्रफ यांना उमेदवारी देण्यात आली. राजू पाल यांना बसपकडून तिकीट मिळालं व त्यांनी अश्रफ यांना हरवून आमदार झाले. या पराभवामुळे दुखावलेल्या अहमद कुटुंबीयांनी राजू पाल यांची हत्या केली.

त्याचवेळी या खटल्याचा निकाल येण्यापूर्वी उमेशची आई शांती देवी यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. उमेशच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाने खूप संघर्ष केला आहे. जेल हे त्याचे (अतीक अहमद) घर आहे आणि तिथून तो काहीही करू शकतो.

दरम्यान अतीक अहमदला कालच गुजरातच्या साबरमती जेलमधून उत्तर प्रदेश येथे आणण्यात आले होते. यावेळी अतीक अहमद हा युपीच्या पोलिसांना इतका घाबरला होती की, लघवी करण्यासाठी देखील तो रस्त्याच्या मध्ये थांबला होता.

काही माध्यमांनी त्याचे प्रक्षेपण देखील केले आहे. याआधी विकास दुबेचा ज्याप्रकारे एनकाउंटर करण्यात आला होता. तसाच एनकाउंटर आपला होईल अशी भिती अतिकला होती म्हणून बाजूला न जाता रस्त्याच्या मध्येच त्याने लघवी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या