Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रविधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

मुंबई | प्रतिनिधी

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची आज विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरेकर यांची यांची निवड माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केली.

- Advertisement -

विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या स्पर्धेत आमदार सुजितसिंह ठाकूर आणि भाई गिरकर यांचीही नावे आघाडीवर होती. मात्र, त्यांना मागे सारत दरेकर यांनी बाजी मारली.

भाजप-शिवसेनेच्या तत्कालीन युती सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. अभ्यासू असलेल्या मुंडे यांनी आपल्या भाषणांनी विधान परिषद दणाणून सोडली होती.

आता तसाच आक्रमक आणि अभ्यासू नेता सभागृहाला मिळावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान,  कुणाच्या गळ्यात पक्षनेतेपदाची माळ पडणार याची उत्सुकता होती.

अखेर आज, ही उत्सुकता संपली असून या पदावर प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे चर्चेत होती. मात्र, दरेकर यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली.

- Advertisment -

ताज्या बातम्या