राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
अहमदनगर पाटबंधारे विभागातील प्रवरा कालव्याची कालवा सल्लागार बैठक नागपूर येथे बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता विधानभवनात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
या बैठकीस सर्व संबंधीत लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत 2022-23 मधील सिंचन व बिगरसिंचन आवर्तन कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.
नाशिक पाटबंधारे विभागातील गोदावरी कालव्याची कालवा सल्लागार बैठक नागपुर येथे 22 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता विधान भवनात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीस सर्व संबधीत लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.