Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रवरा नदीवरील सर्व घाटांच्या नूतनीकरणासह सुशोभीकरण होणार - सौ. तांबे

प्रवरा नदीवरील सर्व घाटांच्या नूतनीकरणासह सुशोभीकरण होणार – सौ. तांबे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवाकडे वाटचाल करणार्‍या

- Advertisement -

संगमनेर शहरात प्रवरा नदीकाठी असलेल्या सर्व घाटांच्या नूतनीकरणासह सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

या घाटांच्या सुशोभीकरणाबाबत अधिक माहिती देताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून शहराचे वैभव ठरणार्‍या गंगामाई घाट परिसरातील निसर्गरम्य वातावरणात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगरपरिषदेने या घाट परिसरात सुशोभीकरण करत नागरिकांना बसण्यासाठी बाकडे यांची व्यवस्था करत, जॉगिंग ट्रॅक तयार केले.

तसेच या घाटांवर सुरू करण्यात आलेले ओपन जिम ही सर्वांचे आकर्षण ठरले आहेत. त्यामुळे या परिसरात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने आपला निवांत व प्रसन्न वेळ घालवण्यासाठी येत आहेत. याठिकाणी पक्षांचा किलबिलाट, नितळ वाहणारे प्रवरा माईचे पाणी, सर्वत्र हिरवाई, घाटांच्या कडेला असलेली जॉगिंग ट्रॅक यामुळे लहानथोर सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत या परिसरात वावरत असतात.

मात्र पावसाळ्यात आलेल्या पुराने काही घाटांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व घाटांच्या दुरुस्तीसाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून या परिसरातील वाल्मिक घाट ते गंगामाई घाटांचे दुरूस्तीसह व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

या सुशोभीकरण अंतर्गत संरक्षण भिंतीची दुरुस्ती, पायर्‍यांची दुरुस्ती, जॉगिंग ट्रॅक काँक्रिटीकरण, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, करण्यात येणार आहे. नव्याने होणार्‍या सुशोभीकरण यामुळे या परिसरात अधिक प्रसन्नता व सुविधा निर्माण होणार असून शहरातील नागरिकांसाठी हे मोठे पर्यटनस्थळ ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या