Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रांताधिकारी अनिल पवार सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी

प्रांताधिकारी अनिल पवार सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मतदार केंद्र स्थळी अधिकारी अर्थात बीएलओ यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे आपल्या विभागात मतदारांची वेगवेगळी माहिती गोळा करणे शक्य झाले, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अनिल पवार यांनी केले.

- Advertisement -

जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून येथील उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अनिल पवार यांची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निवड केली. त्याबद्दल तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी श्री. पवार यांचा सत्कार केला. सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते.

श्री. पवार म्हणाले, बीएलओ यांना मतदार नोंदणीबाबतचे महत्त्व पटवून दिल्यानंतर कामाची गती वाढली. काम करण्यास अगोदर असमर्थता दर्शविल्यानंतर सर्व बीएलओंंना मतदार नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यांनतर सर्वंकष अशी नोंदणी करता आली. या सर्व कामांचे श्रेय सर्व बीएलओ यांना जाते. प्राथमिक शिक्षकांसह नगरपालिकेचे कर्मचारी आणि इतरांचे त्यात खूप मोठे योगदान आहे.

कार्यक्रमास परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड, नायब तहसीलदार चंद्रकांत दुर्गे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या