प्रहारतर्फे कांदा निर्यात बंदी निषेधार्थ मुंडन आंदोलन

येवला | Yeola

(सुनील गायकवाड)

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी करून मोहम्मद तुघलकी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना जेरीस आणण्याचा प्रकार सुरुच ठेवला आहे.

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरोधात आज रोजी गुरुवार (दि. १७) सकाळी ८ वाजता येथील पालखेड पाटबंधारे विभागाच्या मोडकळीस आल्याने अडगळीत असलेल्या वसाहतीत प्रहारच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले.

गेली सहा महिने लॉकडाऊन दरम्यान बाजार पेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मातीमोल दराने कांदा विकावा लागला. आधीच खराब हवामानामुळे अत्यल्प निघालेले उत्पादन, अतिवृष्टीने साठवणुकीत मोठ्या प्रमाणात खराब झालेला कांदा उकिरड्यावर फेकावा लागला.

यातून थोड्या प्रमाणात शिल्लक राहिलेल्या कांद्यास चार दिवसापासून थोडा बऱ्यापैकी भाव मिळू लागताच, कुणाचीही ओरड नसताना केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचेच काम केले आहे.

चार महिन्यापूर्वीच मोठा गाजावाजा करत कांदा जीवनावश्यक वस्तू मधून वगळून निर्बंधमुक्त केल्याचा डांगोरा मोदी सरकारने पिटुन वाहवा मिळवली होती. आज देश आर्थिक संकटात असून केवळ शेतीमुळे देशाची अर्थव्यवस्था थोडीका होईना जिवंत आहे.

देशाला आज मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गरज असताना, ते मिळवून देणाऱ्या प्रमुख वस्तू पैकी कांदा प्रमुख असताना अचानक निर्यात बंदी लादणे म्हणजे अर्थ व्यवस्थेशी पर्यायी देशाशिच मोदींनी द्रोह केला आहे. कुठलीही माहिती, कुणाशीही चर्चा न करता, वा अहवाल न मागवता मोदी सरकारने नेहमी प्रमाणेच मनमानी करत सुलतानी पद्धतीने निर्यात बंदी केली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *