सुनील तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांची हकालपट्टी; अजित पवार गटाकडून मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

जयंत पाटील (Jayant Patil) यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले असून सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केली आहे…

एकनाथ शिंदेंनंतर काल (दि. 2) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत ४० आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण ९ जणांनी शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकाणात नव्या पर्वाला सुरूवात झाली असून, शपथविधीनंतरही अनेक घडामोडी घडत आहेत. आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत वरील घोषणा केली.

अजित पवार यांची गटनेतेपदी, तर अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्षाने मला अधिकृत रितीने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी सप्टेंबर २०२२ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो. जयंत पाटील यांची नियुक्ती आम्ही केली होती. संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती. तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. आम्ही आता जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करत आहोत. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...