Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील आदिवासी बचत गटांसाठी खास योजना; या आहेत अटी

जिल्ह्यातील आदिवासी बचत गटांसाठी खास योजना; या आहेत अटी

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आठ तालुक्यात आदिवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी पोल्ट्री उद्योग (Poultry Farming) व शेळी पालनासाठी (Goat Farming) अर्थ सहाय्य दिले जाणार आहे. कोंबड्या, अंंडी, शेऴी पालनातुन त्यांनी आपला आर्थिक विकास करुन दाखवावा असे आदिवासी खात्याला (Tribal Department) अपेक्षीत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्रंंबक, दिंडोरी, पेठ, येवला, निफाड व सिन्नर या तालुक्यातील आदिवासी बचत गटांसाठी (Tribal Self Group) ककुट पालन योजना आहे.

यासाठी बचत गट सदस्यांच्या नावे किमान अर्धा एकर जमीन असावी, बारमाही पाणी, वीज, पाणी रस्ते असावे, स्वताःची जागा नसल्यास किमान पाच वर्ष भाडे तत्वावर जमीन देणारी असावे, यापुर्वी त्या बचत गटाने कोणताही शासकीय लाभ घेतला नसावा.

बचत गट तंटामुक्त असावा, वाद नसावे. कुकुटपालसाठी २१ व शेळी पालनासाठी २० बचत गटांना आदिवासी विकास विभागातर्फे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

त्यासाठी सहा ऑगस्टपर्यंंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांंच्या मार्गदर्शनाखाली ही निवड होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या