Thursday, April 25, 2024
Homeनगरपोल्ट्री व्यवसायाला शासनाने मदत करावी- निर्मळ

पोल्ट्री व्यवसायाला शासनाने मदत करावी- निर्मळ

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

मान्सुनच्या पावसाने दडी मारल्याने शेती क्षेत्रावर भयानक आर्थिक संकट कोसळले आहे. या दुष्काळाच्या झळा दुग्ध व्यवसायाबरोबर पोल्ट्री व्यवसायालाही बसत आहेत.स्थानिक कर, खाद्याचे वाढलेले भाव, वीज बिल, वाढता मेंटेनन्स, पाण्याची कमतरता यामुळे पोल्ट्री व्यवसाय तोट्यात जात आहे. शासनाने या व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांनी केली आहे.

- Advertisement -

पिंपरी निर्मळ परिसरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय केला जातो. मात्र चालू वर्षी मान्सुनच्या पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके वाया गेल्यात जमा आहेत. पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्नही बिकट झालेला आहे. शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय या परिसरात मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र वाढलेले पशुखाद्याचे भाव, वीज बिल, पाणी टंचाई वाढता मेंटेनन्स खर्च ग्रामपंचायतीचे स्थानिक कर यामुळे या व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे.

व्यवसायासाठी कर्ज काढून लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकर्‍यांनी केलेली आहे. मात्र होणार्‍या तोट्यामुळे बँकांचे व्याजही भरणे अवघड होत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून पोल्ट्री व्यवसायाला मदत करण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या