रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य; रस्ता दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

jalgaon-digital
3 Min Read

म्हाळसाकोरे । वार्ताहर | Mhalsakore

नावलौकीकाला जपणार्‍या नामवंत कंपनीने घोटी, सिन्नर, म्हाळसाकोरे, पिंपळगाव, वणी, सुरत या राज्य मार्गाचे (State Road) काम सुरू केले पण

तेही म्हाळसाकोरेत बसस्टॉप (bus stop) जवळ शंभर मीटरचे अर्धवट काम सोडुन गाशा गुंडाळून गायब झाले. पडलेल्या खड्डयांमुळे (potholes) शेतमाल वाहतुकीसह प्रवाशांचे अपघात (accidents) होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन (agitation) करण्याचा निर्णय घेत तसा ठराव ग्रामसभेत केला आहे.

गेल्या वर्षापूर्वी घोटी-वणी-सुरत या 27 राज्य मार्गाचे नुतनीकरण (Renewal of State Highways) करण्यात आले. पण म्हाळसाकोेरेत बसस्टॉप शेजारी शंभर दिडशे मीटर रस्ता फक्त ठेकेदाराने खोदून ठेवल्यामुळे गुडघ्या एवढे खड्डे तयार झाले आहे. पावसाच्या पाण्याने (rain water) हे खड्डे भरल्याने वाहन धारकास या खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होण्याचे प्रकार वाढत आहे. पायी तर सोडाच वाहनावर बसुन देखील प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

पावसामुळे तर रस्त्यावरुन कंबरे एवढे पाणी वाहते तेव्हा तासन्तास वाहतुक ठप्प (traffic jam) असते हे येथील नागरिकांच्या पाचीलाच पुजलेल. तालुक्यात टोमॅटो हंगाम (tomato season) सुरु असल्याने हिवरगाव येथे नव्याने टोमॅटो मार्केट सुरु असल्याने टोमॅटोची मोठ्या प्रमाणात वाहतुक या मार्गाने होते. रस्ता नादुरुस्त असल्याने वेळेवर बाजारपेठेत टोमॅटो पोहचत नसल्याने शेतकर्‍यांचे (farmers) आर्थिक नुकसान होते.

कित्येकदा याठिकाणी टोमॅटोने भरलेले वाहने पलटी होऊन नुकसान झाले आहे. या रस्त्याकडे पाहुन कुणी म्हणणार नाही हा राज्यमार्ग आहे. आपण सामान्य माणसे ही कंपनी का निघुन गेली ते अद्यापही ग्रामस्थांना कळाले नाही. रस्त्याच्या गटारी (Sewerage) अर्धवट सोडल्या, बाजारतळ, मराठी शाळा, गावातील पाणी वाहुन जात नसल्याने तुंबारे तयार होऊन तळे तयार झाले. रस्त्याच्या दुतर्फा एकही झाड लावलेले नाहीत. पण रस्ता पूर्ण करण्यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली गेली.

गतिरोधक (speed breaker), दिशादर्शक फलकांचा वळणावरील रस्त्यावर तपास नाही. कोट्यावधी रुपयांची मंजुरी असलेल्या या रस्त्याला दुदैवाचे दशावतार म्हणायचे काय? बांंधकाम अधिकारी कंपनीला आदेश देतात आधी खोदलेला रस्ता पूर्ण करा. कंपनी म्हणतेय हा गावचा प्रश्न आहे. मग खोदलेला रस्ता पूर्ण होणार तरी कसा असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

वर्ष होऊन गेलेे अर्धवट काम करून आणखी कमकुवत करून ठेवलेला हा रस्ता अशा स्थितीत पुढील वर्षभर जिवंत तरी राहील का याची शंका आहे. अपघात वाढले मात्र जिवाची पर्वा कुणालाच नाही. वीस वर्षांपूर्वी या रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा मिळाला आताशी रस्त्याचे काम होतेय त्यात अशी परिस्थिती अजुन किती वर्षे हाल सोसायचे ते आता बांधकाम विभागाने एकदाचे जाहिर करावे अशी मागणी वाहनचालक, प्रवाशी करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *