Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदेशातील 24 राज्यांत 15 टक्क्यांहून जास्त पॉझिटिव्हीटी रेट

देशातील 24 राज्यांत 15 टक्क्यांहून जास्त पॉझिटिव्हीटी रेट

नवी दिल्ली – देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 15 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर 8 राज्यांमध्ये 5 ते 15 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असून 5 टक्क्यांहून कमी पॉझिटिव्हीटी रेट 4 राज्यांमध्ये आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज दिली.

ते म्हणाले, देशात आतापर्यंत उपचारानंतर 83.26 टक्के करोना रुग्ण बरे झाले असून सुमारे 37.1 लाख सक्रिय रुग्णांची संख्या आहे. 3 मेला रिकव्हरी रेट 81.3 टक्के होता ज्यानंतर रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 62 हजार 727 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरू आहे आणि आतापर्यंत 17 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

10 राज्यांमध्ये संक्रमण दर 25 टक्क्यांहून जास्त आहे आणि 18 राज्यांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक आहे. ही बाब चिंताजनक असून यावर लक्ष देणे आवश्यक आहे. देशातील 12 राज्यांमध्ये 1 लाखांहून अधिक सक्रिय आहेत. तर 8 राज्यांमध्ये 50 हजार ते 1 लाख दरम्यान सक्रिय रुग्ण असून 15 राज्यात 50 हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या