Wednesday, May 8, 2024
Homeजळगावज्वालाग्रही पदार्थाची विक्री करणार्‍यांवर कारवाई

ज्वालाग्रही पदार्थाची विक्री करणार्‍यांवर कारवाई

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

शहरात विनापरवानगी अवैधरित्या (Calcium carbide) कॅल्शीयम कार्बाईड विक्री करणार्‍या दोन ठिकाणी (midc police) एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यात दोघ ठिकाणाहून सुमारे 12 हजार रुपये किमतीचा हा ज्वालाग्राही पदार्थ हस्तगत करण्यात आला असून त्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवागनी अवैधरित्या कॅल्शीयम कार्बाईड हा ज्वलनशील पदार्थ विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी (Police Inspector Pratap Shikare) पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानी तात्काळ अतुल वंजारी, इम्रानअली सैय्यद, सचिन पाटील, सुधीर सावळे, गोविंदा पाटील यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले.

या पथकाने काशिनाथ चौकातील झेनीष हार्डवेअरमध्ये अब्देली शब्बीर नगरी हा त्याच्या दुकानामध्ये विनापरवाना अवैधरित्या नागरिकांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने कॅल्शीयम कार्बाईड हया ज्वालाग्रही स्फोटक पदार्थाची विक्री करीत हाता. त्याच्या दुकानात छापा टाकला असता, त्याठिकाणाहून 8 हजार रुपये किंमतीचा एका गोलाकार आकाराच्या लोखंडी ड्रममध्ये सुमारे 50 किलो कॅल्शीयम कार्बाईडचे दगड जप्त करण्यात आले.

तुकाराम वाडीतून 4 हजारांचा ऐवज जप्त

जुने जळगावातील रहिवासी विजय गोविंद भंगाळे यांचे शहरातील तुकारामवाडी परिसरातील विजय हार्डवेअर म्हणून दुकान आहे. त्यांच्या दुकानात एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असता, त्याठिकाणाहून ड्रममध्ये ठेवलेले 4 हजार रुपये किंमतीचे 25 किलो कॅल्शीयम कार्बाईड जप्त करण्यात आले. त्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या