Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेच्या रेल्वे आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त

मनसेच्या रेल्वे आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्त

मुंबई l Mumbai :

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळला.

- Advertisement -

मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला.

रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनी रेल्वे प्रवास केला. ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाकारत नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

नंतर त्यांची सुटका करण्यात आली. “सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करा, अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा.

आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आज नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत,” अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या