Friday, April 26, 2024
HomeUncategorizedरिक्षाचालकाला मारहाण; आमदाराविरुद्ध पोलिसात तक्रार

रिक्षाचालकाला मारहाण; आमदाराविरुद्ध पोलिसात तक्रार

औरंगाबाद – Aurangabad

शिवसेना आमदार अंबादास दानवे (MLa Ambadas Danve) यांनी मारहाण केल्याप्रकरणी रिक्षा चालकाने मंगळवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल (Video viral) करुन आपली समाजात बदनामी केल्यामुळे माझी मानहानी झाली आहे. काही एक चुक नसताना आमदाराने पोलिसांसमक्ष आपल्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी तक्रार रिक्षा चालकाने पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey), पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता (Police Commissioner Dr. Nikhil Gupta) आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन (Lockdown) होणार असल्याने नागरिकांनी रस्त्यांवर बाजारात जाण्यासाठी आदल्या दिवशी सोमवारी एकच गर्दी केली होती. त्यामुळे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास क्रांतीचौकात प्रचंड वाहतुक कोंडी झाल्यामुळे तेथून जात असलेल्या आमदार अंबादास दानवे (Sanjay Pandey) यांनी वाहनातून उतरुन वाहतुक सुरळीत करण्यासाठी धाव घेतली. त्याचवेळी अचानक रिक्षा (एमएच-20-ईएफ-3225) चालक अजय अशोक जाधव (रा. वेदांतनगर, व्यंकटेश कॉलनी, उस्मानपुरा) याने वाहतुक कोंडीतून भरधावपणे रिक्षा दामटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रस्ता ओलांडून क्रांतीचौक पेट्रोल पंपाच्या कोप-यावर आलेले आमदार दानवे यांनी रिक्षा चालक अजय जाधवला थांबवून कानशिलात लगावली होती. तसेच शिवीगाळ देखील केली होती. या सर्व घटनेचा व्हिडीओ आमदार दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलसह सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल केला होता.

दरम्यान, अजय जाधव याच्या तक्रारीनुसार तो मित्राचा रिक्षा घेऊन शहागंज, मोंढा येथे किराणा साहित्य व भाजीपाला आणण्यासाठी जात होता. मात्र, आमदार दानवे यांनी काही चुक नसताना मला शिवीगाळ व मारहाण केली. मी त्यांना माझी चुक काय असे विचारत होतो. त्यावेळी त्यांच्यासोबत पोलीस देखील होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मला शिवीगाळ केली. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे. माझ्या आई-वडीलांना मित्र व नातेवाईक या प्रकाराबद्दल विचात असल्यामुळे माझी बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करुन मला न्याय मिळवून द्यावा असे जाधव याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या