Friday, April 26, 2024
Homeनाशिकढोल सरावावर अखेर पोलिस आयुक्तांचा ‘अंकूश’

ढोल सरावावर अखेर पोलिस आयुक्तांचा ‘अंकूश’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात ढोल वादकांच्या सरावाचे कार्यक्रम सूरू आहेत. यापासून नागरीकांना त्रास होऊ नयेत यासाठी पोलिस आयुक्तांनी ढोल पथकांची बैठक घेण्याचे निर्देश देत सर्व पोलिस ठाण्याना देतानाच आदर्श नियमावली लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

शहरात ढोल वादनातून त्रास होत असल्यंच्या तक्रारी ‘देशदूत’मध्ये आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ‘देशदूत’मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सिताराम कोल्हे यांनी शहरातील सर्व ढोल पथकांसाठी आचार संहिता लागू केली आहे.नागरीकांनी त्यांच्या आदेशाचे स्वागत केले आहे.

या पार्श्वभूुमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने या ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठीच्या आचार संहितेचे आदेश जारी केले आहेत. त्या आदेशात त्यांनी ढोल पथकांच्या सरावाबाबत मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. त्यात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ढोल पथकांचे सराव सुरु झोलेले आहेत. कर्कश्य आवाज व वेळेचे बंधन न पाळण्यातून नागरीकांना त्रास होऊ शकतो या अनुषंगाने सर्व पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

मार्गदर्शक सुचना

त्यात त्यांनी ढोल पथकांचा सराव हा बंदिस्त जागेवर होईल, आवाज बाहेर येणार नाही. सराव रात्री १० च्या आत बंद होईल, सरावाच्या आवाजाची मर्यादा नियमानुसार राहील, बंदिस्त जागेत ढोल पथकाचा सराव सूरु असेल, त्याठिकाणच्या सामान्य नागरीक व विद्यार्थ्याना त्याचा त्रास होणार नाही. तसेच सरावात मुले मुली समाविष्ट असतात, त्याठिकाणी छेडखानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याबाबत ढोल पथकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना त्याबाबत अवगत करावे. असे पोलिस आयुक्तांच्या वतीने सहायक पोलिस आयुक्त सिताराम कोल्हे यांनी आदेश निर्गमित केले आहे.पोलिसांच्या या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या