Thursday, April 25, 2024
Homeजळगावकोम्बिंग ऑपरेशन; 28 दुचाकी जप्त

कोम्बिंग ऑपरेशन; 28 दुचाकी जप्त

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमिवर आज शनिवारी पहाटेच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह 17 अधिकारी व 140 कर्मचार्‍यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला.

- Advertisement -

शहरातील सकाळी 6 ते 10 या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येवून वाहनांसह रेकॉर्डवरील संशयितांची तपासणी करण्यात आली. यात एकूण 416 वाहनाची तपासणी करण्यात येवून कागदपत्रे नसलेली संशयास्पद 28 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

तसेच रेकार्डवरील 24 संशयितांची तसेच हद्दपार 11 संशयितांची तपासणी करण्यात आली. यात एक हद्दपार आरोपी मिळून आला असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अचानकच्या या मोहिमेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

कर्मचार्‍यांची पथके तयार करुन तपासणी

जळगाव जिल्ह्यासह शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात शहरातील पाच पोलीस ठाण्यात अनेक गुन्हा दाखल झाले आहे. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये आज शनिवारी 17 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह सर्व पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा अशा एकूण 17 अधिकारी व 140 कर्मचार्‍यांचा फौजफाटा कारवाईसाठी रस्त्यावर उतरला. पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाईसाठी कर्मचार्‍यांची सहा पथके तयार करण्यात आली. व दुचाकी वाहनांसह संशयितांची तपासणी मोहिम राबविण्यात आली.

तीन तासात 416 वाहनांची तपासणी

अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाती प्रत्येक भागात जावून चौकात प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली आहे. यात वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर वाहन सोडले जात होते. तर कागदपत्रे नसलेली संशयास्पद वाहने जमा केली जात होती. याप्रमाणे सकाळी 6 ते 10 या वेळेत शहरातील कांचन नगर, तांबापूरा, गेंदालाल मिली, पिंप्राळा हुडको, शिवाजीनगर हुडको, शनीपेठ परिसर, मास्टर कॉलनी, सुप्रिम कॉलनी यासह शहरातील विविध भागांमध्ये 416 दुचाकींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी संशयास्पद अशी 48 वाहने जमा करण्यात आली.

रेकॉर्डवरील संशयितांसह हद्दपार आरोपींचीही तपासणी

कारवाईदरम्यान शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या एकूण 24 संशयितांचीही यावेळी तपासणी करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणार्‍या तसेच 45 वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन 9 हजार रुपयांचा दंडही यावेळी वसूल करण्यात आला. वाहनांची तपासणी करत असतांना पथकाला एका ठिकाणी अवैधपणे गावठी दारुची विक्री होत असल्याचे दिसून आले. त्याच्यावर कारवाई करण्यात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हद्दपार 11 आरोपींची तपासणी करण्यात आली. यात एक संशयित हा हद्दपार असतांनाही घरी आढळून आल्याने त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या